संयुक्त राष्ट्रे : दहशतवादी संघटना असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीच जाहीर केलेल्या गटांच्या नेत्यांवर बंदी घालण्याचा विचार करण्यावरच, अनेक महिने लागत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर कठोर टीका केली आहे.‘जैश- ए- महंमद’चा (जेईएम) प्रमुख मसूद अझहर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालावी, यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना प्रलंबित’ ठेवल्याचा संदर्भ यामागे आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांवर बंदी घालण्यात परिषदेच्या असहायतेवर भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांनी टीका केली. संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहरला दहशतवादी जाहीर करावे, यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना चीनने तांत्रिक मुद्द्यावर अडवून ठेवले होते. या तांत्रिक अडथळ््याची सहा महिन्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर, चीनने आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. गोगलगाईची गती आणि सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवरील कधीही न संपणारी चर्चा यावर अकबरुद्दीन यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ही कोंडी फोडण्याची वेळ आलेली आहे.’ (वृत्तसंस्था)
युनोच्या सुरक्षा परिषदेवर भारताचा जोरदार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2016 6:17 AM