नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याचा स्पष्ट आरोप भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. पाकिस्तानने या प्रकरणात व्हिएन्ना करार पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी अशी मागणी भारताने केली होती. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. आज सायंकाळी भारतीय दूतावास आणि विधिज्ञ यांची टीम नेदरलँड येथील द हेग येथील आंतराष्ट्रीय कोर्टात दाखल झाली आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने भारताचे बाजूने निकाल दिला असून भारतासाठी हा ऐतिहासिक दिवसचं म्हणावा लागेल. भारताच्या दूतावासासह पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री प्रवक्ता डॉ मोहम्मद फैसल हे देखील आंतराष्ट्रीय कोर्टात हजर आहेत. हा निकालाकडे भारतासह पाकिस्तानचे देखील सर्व लक्ष वेधले होते. कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात १६ न्यायधीश निकाल देत आहेत. या न्यायधीशांमध्ये १ भारतीय आणि १ पाकिस्तानी न्यायाधीशांसह इतर देशांच्या न्यायाधीशांचा समावेश आहे.
न्या. टॉमका हे वरिष्ठ न्यायधीश
स्लोवाकियाचे न्यायधीश पीटर टॉमका हे कुलभूषण जाधव खटल्यातील आंतरराष्ट्रीय कोर्टातील पॅनलमधील वरिष्ठ न्यायधीश आहेत. टॉमका हे संयुक्त राष्ट्रात स्लोवाकियाचे राजदूत पदी देखील होते. २००३ साली ते आंतरराष्ट्रीय कोर्टात कार्यरत झाले. टॉमका २०१२ ते २०१५ पर्यंत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे अध्यक्षपदी कार्यरत होते. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचे उपाध्यक्ष पद देखील भूषविले आहे.
सोमालियाचे जज अब्दुलकवी अहमद यूसुफ, चीनचे जज शू हांकिन, फ्रांसचे जज रॉनी अब्राहम, भारताचे जस्टिस दलवीर भंडारी, ब्राजीलचे जज एंटोनियो ऑगस्टो ट्रिनडाडे, ऑस्ट्रेलियाचे जज जेम्ल रिचर्ड क्रॉफोर्ड, मोरक्कोचे जज मोहम्मद बेनौना, अमेरिकेचे जज जोआन ई डोनोह्यू , इटलीचे जज जॉर्जिओ गजा, जमैकाचे जज पैट्रिक लिप्टन रॉबिंसन, युगांडाचे जज जूलिया सेबुटिंडे, रूस फेडरेशनचे जज किरिल, पाकिस्तानचे जज तस्सदुक हुसैन जिलानी, लेबनानचे जज नवाज सलाम आणि जपानचे जज यूजी इवसावा या १६ जजचे पॅनल कुलभूषण प्रकरणी अंतिम निकाल देण्यात आंतरराष्ट्रीय कोर्टात सामील होते.