Indigo Flight News : गेल्या काही काळापासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता ताजी घटना इंडिगो कंपनीच्या विमानासोबत घडली. इंडिगोची फ्लाइट इस्तंबूलहून नवी दिल्लीला येत होती, यादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान वेळेवर उड्डाण घेऊ शकले नाही. काही तासानंतर विमानाने उड्डाण घेतली.
200 प्रवासी 10 तास अडकून पडलेमिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीला येणारे इंडिगोचे विमान बुधवारी 20:00 वाजता उड्डाण करणार होते. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उड्डाण करायला उशीर झाला. विशेष म्हणजे, विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे लहान मुले आणि वृद्धांसह 200 हून अधिक प्रवासी इस्तंबूल विमानतळावरच 10 तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले.
इंडिगोने प्रवाशांना ही माहिती दिलीइंडिगोने सांगितले की, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे इस्तंबूलहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइट 6E 12 ला उशीर झाला. उशीर होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यांना अल्पोपाहारही देण्यात आला. तसेच, आवश्यक तपासण्यांनंतर त्याच विमानाने उड्डाण केल्याचे कंपनीने सांगितले.