जकार्ता : इंडोनेशियात सुलावेसी बेटावर झालेल्या भूकंपानंतर भूस्खलनात ३४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या या भूकंपानंतर अनेक लोकांना रात्रीच घर सोडावे लागले.
इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात शेकडो लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने जारी केलेल्या एका व्हिडीओत दिसत आहे की, एक मुलीला घरातील ढिगाऱ्याखालून बाहेर काढले जात आहे. या भूकंपात एका रुग्णालयाचा काही भाग कोसळला आहे. रुग्णांना बाहेर काढले जात आहे. पीडित लोकांसाठी शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.२ होती. याचा केंद्रबिंदू पश्चिम सुलावेसी प्रांतात मामुजू जिल्ह्यात १८ किलामीटर खोलात होता.