शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

किम जोंग-नाम हत्येप्रकरणी इंडोनेशियन महिलेला अटक

By admin | Published: February 17, 2017 12:51 AM

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांच्या सावत्र भावाचा मृतदेह मलेशिया परत करणार आहे, असे उपपंतप्रधान अहमद झाहीद

कुआला लुम्पूर : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांच्या सावत्र भावाचा मृतदेह मलेशिया परत करणार आहे, असे उपपंतप्रधान अहमद झाहीद हमिदी यांनी गुरुवारी वार्ताहरांना येथे सांगितले. हत्येप्रकरणी इंडोनेशियाच्या महिलेला अटक झाली.मृतदेह परत करा, अशी विनंती उत्तर कोरियाने केल्याच्या वृत्ताला हमिदी यांनी दुजोरा दिला. मृतदेह परत करण्यापूर्वीची आवश्यक ती कार्यपद्धती अवलंबिली जाईल, असे ते म्हणाले. कुआला लुम्पूर विमानतळावर सोमवारी जी व्यक्ती ठार झाली ती किम जोंग-नाम (४५) असून किम जोंग-ऊन यांचा तो त्यांच्यापासून वेगळा राहणारा सावत्र भाऊ आहे. मलेशियाने या विषयावरील आपल्या अधिकृत निवेदनात फक्त कोरियन पुरूष एवढाच उल्लेख केला होता. किम हे पासपोर्टवर किम चोल अशा नावाने मलेशियात आल्याचे मानले जाते. किम चोल हे त्यांचे उर्फ नाव होते, असे दक्षिण कोरियाच्या प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर प्रमुखांनी म्हटले आहे की किम जोंग-नाम हे कुआला लुम्पूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मकाऊला जाण्यासाठी विमानाकडे जात असताना त्यांच्यावर उत्तर कोरियातील हस्तकांकडून विष प्रयोग झाला. मलेशियाने बुधवारी नाम यांचे शवविच्छेदन केले. परंतु त्याचा निष्कर्ष जाहीर केलेला नाही. नाम यांच्यावर खरोखर विषप्रयोग झाला का यावर शवविच्छेदनाच्या निष्कर्षांनी प्रकाश पडेल. शवविच्छेदनाला उत्तर कोरियाने आक्षेप घेतला होता. परंतु मलेशियाने शवविच्छेदन केले कारण उत्तर कोरियाने औपचारिक निषेधही दाखल केलेला नव्हता, असे मलेशियाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल समाह मात यांनी सांगितले.