इंडोनेशियामध्ये 5.9 तीव्रतेच्या भूकंपाचा मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात चर्चमध्ये बायबलचा अभ्यास करणाऱ्या 34 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 52 जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
इंडोनेशियात गेल्या आठवड्यापासून पाऊस आणि वादळामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला होता. दरम्यान, येथे भूकंप व त्सुनामीच्या बसलेल्या तडाख्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 832 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने रविवारी मृतांचा नवा आकडा जाहीर केला. त्यात, आज पुन्हा एकदा इंडोनेशियात 5.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून त्यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे.