Infamous Drug Lord Rafael Caro Quintero Arrested: मेक्सिकोच्या नौदलाने शुक्रवारी कुख्यात ड्रग्स तस्कर राफेल कारो क्विन्टेरो याला अटक केली. राफेल हा एफबीआच्या टॉप 10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत होता. क्विंटरोवर 1985 मध्ये अमेरिकन डीइए एजंटच्या हत्येचा आरोप आहे. राफेल कारोच्या अटकेसाठी मेक्सिकन नौदलाने अभियान चालवलं, पण त्याला पकडण्यात सर्वात मोठी भूमिका का श्वानाने बजावली.
मॅक्स नावाचा हा श्वान या मिशनमधील सर्वात मोठा नायक म्हणून समोर आला. ब्लडहाउंड प्रजातीची ही मादा श्वान मेक्सिकन मरीनचा भाग आहे. कारोला सिनालोआच्या सॅन सायमन शहरातील एका जंगलात ट्रॅक करणे आणि शोधण्याचं पूर्ण श्रेय मॅक्सला जातं.
2016 मध्ये जन्मावेळी मॅक्सचं वजन जवळपास 78 पाउंड होतं. मेक्सिकन सेनेने सांगितलं की, जेव्हाही ट्रॅकिंगचा मुद्दा येतो तेव्हा कॅनाइन एक तज्ज्ञ असतो. ब्लडहाउंडने सैन्यदलासोबत अनेक सर्च ऑपरेशन केले. तेच कारोच्या अटकेनंतर अमेरिकेने मेक्सिकोच्या या प्रयत्नाचं कौतुक केलं. अमेरिकेचे अटॉर्नी जनरल मेरिक गारलॅंड म्हणाले की, ते कारोच्या प्रत्यार्पणाची लवकरच मागणी करतील.
दरम्यान अटकेआधी क्विटंकोवर 20 मिलियन डॉलर बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. इतिहासात कोणत्याही ड्रग तस्करासाठी ही खूप मोठी रक्कम होती. आता अटकेनंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळू शकते. कारोला याआधी दोनदा पकडण्यात आलं होतं. पण दोन्ही वेळा तो तुरूंगातून पळून गेला होता.