रियाध : या घटनेचे तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. मात्र, ही खरी घटना आहे. सौदी अरेबियातील मोहंमद अल आलम वयाच्या ९२ व्या वर्षी पिता बनले आहेत. मुलाच्या जन्मामुळे आलम व त्यांच्या पत्नी अबीर यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आलम यांना आधीच्या सात मुली आणि पाच मुले आहेत; परंतु दुसरी पत्नी अबीर पहिल्यांदाच आई बनली आहे. ४२ वर्षांच्या अबीर आलम यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आलम यांनी त्यांच्याशी विवाह केला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना १२ अपत्ये आहेत. मात्र, आता त्यांना आणखी एक मुलगी झाली आहे. या मुलीचे नाव तमारा ठेवण्यात आले. अबीर बोलू शकत नाहीत किंवा त्यांना ऐकूही येत नाही. ९२ वर्षांच्या वयस्कर व्यक्तीसोबत विवाह केल्यामुळे आपण कधी आई बनू शकू, अशी त्यांना आशा नव्हती. त्यामुळे त्यांनी आई होण्याची कधी कल्पनाही केली नव्हती; परंतु निसर्गाने त्यांच्या पदरात कन्येचे दान टाकले. वयस्कर व्यक्ती पिता बनल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तथापि, नव्वदीनंतर एखादा व्यक्ती बाप बनल्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी, असे मानले जाते.
९२ व्या वर्षी अपत्यप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 12:54 AM