शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

महागाईने त्रस्त श्रीलंकावासीयांना अपेक्षा भारताकडूनच !

By किरण अग्रवाल | Published: April 12, 2022 8:48 AM

Srilanka Crisis : महागाईने त्रस्त श्रीलंकावासीयांना आता केवळ भारताकडूनच अपेक्षा आहेत.

- किरण अग्रवाल

कँडी - महागाईने त्रस्त झालेल्या श्रीलंकेतील नागरिकांना या अडचणीच्या काळात भारताकडूनच मदतीची आस असून, आंतरराष्ट्रीय राजकारणाशी घेणेदेणे नसलेले लोक भारतच आपल्याला वाचवू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. 

श्रीलंकेत महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडायला आले आहे. देशाची राजधानी कोलंबोपासून कँडीपर्यंत ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. टंचाई असल्याने इंधनाची दरवाढ झाली आहेच, विजेची टंचाई असल्याने भार नियमनही करावे लागत आहे. अगदी कोलंबोतील आंतरराष्ट्रीय भंडारनायके विमानतळावरदेखील अनावश्यक विजेचा वापर रोखण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून आले. येथे उतरतांना नेहमी रात्रीच्या वेळी विमानातून जो लखलखाट दिसून येई तो यंदा दिसला नाही. बहुतेक रस्ते व इमारतींमधले लाईट गुल होते.

दरम्यान, श्रीलंकेबाहेर येथील महागाईचा हाहाकार व राजकीय आंदोलनाचे जे चित्र दाखवले जाते आहे त्यामुळे पर्यटनाला फटका बसल्याने त्यावर अवलंबून असलेले प्रचंड नाराज आहेत. प्रत्यक्षात येथे पर्यटकांना कुठलीही अडचण जाणवत नाही. भारतातून येणाऱ्यांचे तर मनोभावे वेलकम केले जात आहे. श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री तथा प्रख्यात क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा व सनथ जयसूर्या यांनी व्यक्त केलेल्या भावनेला दुजोरा देत भारतच आमच्या कामी येणारा असून, तोच जन्मजात मोठा भाऊ असल्याचे टॅक्सी चालक प्रियांत सापरमडू सांगतात. 

इंडिया, देन नो प्रॉब्लेम; वेलकम!

चेन्नईवरून कोलंबो विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय पर्यटकांच्या एका ग्रुपला 'यू आर फ्रॉम इंडिया, देन नो प्रॉब्लेम; आयु बोवन.. म्हणजे वेलकम...'  म्हणत फारशा चौकशा न करता सहकार्य केले गेले. 

सत्तेच्या राजकारणातून 

वाढलेल्या महागाईचा फटका गरीब वर्गालाच बसत असून तोच दुकाने व पंपासमोर रांगेत उभा दिसत आहे. उच्चभ्रू वर्ग मात्र यात कुठेच नाही. येथे जे काही सुरू आहे ते सत्तेच्या राजकारणातून होत असल्याचा संतापही अनेकजण व्यक्त करतांना दिसतात.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीय