न्यूयॉर्क : न्यूजर्सी येथील दोन आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांची व्यावसायिक गुपिते चोरल्याप्रकरणी 38 वर्षाच्या भारतीय अभियंत्याला 18 महिन्यांची कैद व 32 हजार डॉलरचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. केतनकुमार मणियार असे या दोषी अभियंत्याचे नाव असून, न्यूजर्सीचा रहिवासी असणा:या केतनकुमारने आपण दोषी असल्याची कबुली अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जोएल पिसानो यांच्यापुढे दिली आहे.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दोन कंपन्यांची व्यावसायिक गुपिते चोरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मणियारला 2क्13 साली अटक झाली असून तेव्हापासून तो तुरुंगात आहे. तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच त्याने 32 हजार डॉलर परत करावेत व गुन्ह्यासाठी वापरलेली साधने जप्त करावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या साधनात संगणक व इतर उपकरणो आहेत. न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यानुसार मणियार वैद्यकीय उत्पादने तयार करणा:या सी. आर. बार्ड कंपनीत अभियंता म्हणून काम करत असे. (वृत्तसंस्था)