मॉस्को : रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट होऊन 10 जण जखमी झाले. या चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा स्फोट नेमका कशाचा होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. स्फोटातील जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष सुरू आहे. अशातच सेंट पीटसबर्ग शहरातील एका सुपरमार्केटमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास स्फोट झाला. सुपरमार्केटमधील गोडाऊनमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात 10 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिका-यांचं बचावकार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार. हा 200 ग्राम टीएनटी क्षमतेचा स्फोट होता. त्यामुळे सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.