अथेन्स : भारतातून ग्रीसमधील डझनभर विद्यापीठांना पाठवण्यात आलेल्या लिफाफ्यांची गुरुवारी दहशतवादविरोधी चौकशी सुरू झाली. या लिफाफ्यांमुळे एका विद्यापीठाच्या सात कर्मचाºयांना बाधा (अॅलर्जी) झाल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.ग्रीसमधील १२ विद्यापीठांच्या प्रमुख अधिकाºयांना (रेक्टर्स) उद्देशून हे लिफाफे पाठवण्यात आले होते. काही लिफाफ्यांत आतमध्ये इंग्लिशमध्ये ‘इस्लामिस्ट कंटेट’ (इस्लामी आशय) असे छापण्यात आले होते, असे पोलीस अधिकाºयाने तपशील न देता सांगितले.छपाईची शाई, चिकटवण्याचा डिंक (अॅडेसिव्ह) उत्पादनात वापरला जाणारा घटकपदार्थ बहुधा हेतूत: लिफाफ्यांमध्ये घालण्यात आला असावा, असे नागरी संरक्षण विभागाच्या सरचिटणीसाने सांगितले. या लिफाफ्यांचा तपास दहशतवादविरोधी पोलिसांची शाखा करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
लेस्बोस बेटावरील युनिव्हर्सिटी आॅफ एजिनच्या प्रमुख अधिकाºयाच्या नावाने आलेल्या लिफाफ्याच्या संपर्कात सात जण बुधवारी रात्री आल्यानंतर त्यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला, असे वृत्त आहे. या विद्यापीठाच्या पाच कर्मचाºयांना आरोग्याच्या किरकोळ तक्रारीनंतर काही तासांसाठी रुग्णालयात ठेवावे लागले होते. त्यांना तोंडात, नाकात व डोळ््यांत दाह व जळजळ झाली. त्यांना गुरुवारी दुपारी घरी जाऊ देण्यात आले. हानिकारक नसल्याचे मतच्काही लिफाफे त्यांच्यावर ज्यांची नावे होती त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच अडवण्यात आले. याशिवाय पश्चिम ग्रीसमधील कोर्फू बेटावरील टपाल कार्यालयातील चार कर्मचाºयांना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वतंत्र खोलीत ठेवले गेले होते.च्तपास करणाºयांनी दिलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटी आॅफ एजिनच्या प्रशासकीय कर्मचाºयांनीच बुधवारी उघडलेल्या लिफाफ्यात तो विशिष्ट पदार्थ होता. तज्ज्ञांच्या मते तो हानिकारक नाही.