उज्बेकिस्तानमध्ये ६५ मुलांचा मृत्यू भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या संदर्भात आता मोठा खुलासा झाला आहे. भारतीय कफ सिरपच्या वितरकांनी अनिवार्य चाचणी टाळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना ३३,००० डॉलर म्हणजे सुमारे २८ लाख रुपये लाच दिल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या सरकारी वकिलांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान केला आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं; काँग्रेसचं मोदींना प्रत्युत्तर, फोटो ट्विट
गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मध्य आशियाई देशाने २० उझबेक नागरिक आणि एका भारतीय नागरिकांसह २१ जणांविरोधात खटला चालवला आहे. प्रतिवादींपैकी तीन हे कुरामॅक्स मेडिकलचे अधिकारी आहेत. उझबेकिस्तानमध्ये भारताच्या मेरियन बायोटेकची औषधे विकणारी ही कंपनी आहे.
राज्य अभियोक्ता सैदकरिम अकिलोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरामॅक्सचे सीईओ सिंग राघवेंद्र प्रतार यांनी कथितपणे सरकारी अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पादनांची अनिवार्य तपासणी टाळण्यासाठी ३३,००० अमेरिकी डॉलर दिले. कफ सिरफची उझबेकिस्तानमध्ये चाचणी घेण्यात आली होती की निर्मात्याला भारतात चाचण्या घेण्याची विनंती करण्यात आली होती की नाही हे फिर्यादी जबाबावरुन स्पष्ट झाले नाही.
कोर्टात निवेदन देणाऱ्या प्रतारने आरोप नाकारले पण रक्कम मध्यस्थामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आली हे मान्य केले. ते पैसे नंतर कसे आणि कोणी वापरले हे माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. २१ पैकी ७ प्रतिवादींना करचोरी, निकृष्ट किंवा बनावट औषधांची विक्री, कार्यालयाचा गैरवापर, निष्काळजीपणा, बनावटगिरी आणि लाचखोरी यासह एक किंवा दुसर्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.