शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण अशांसारख्या बाबी सहजपणे उलगडून दाखवणारे स्फूर्तिदायी हॉकिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 5:01 AM

- डॉ. दीपक शिकारपूरअवकाशसंशोधन, कालगणना, टाइम-ट्रॅव्हल, सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण अशांसारख्या बाबी सहजपणे उलगडून दाखवणारे थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यामुळे अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यांच्या ‘अ ब्रीफ हिस्टरी आॅफ टाइम’ या पुस्तकात वरील सर्व विषयांची सहज स्पष्टीकरणे आहेत. हे पुस्तक अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झाले आहे. त्याचप्रमाणे ‘माय ब्रीफ हिस्टरी’ हे आत्मचरित्रात्मक ...

- डॉ. दीपक शिकारपूरअवकाशसंशोधन, कालगणना, टाइम-ट्रॅव्हल, सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण अशांसारख्या बाबी सहजपणे उलगडून दाखवणारे थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यामुळे अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यांच्या ‘अ ब्रीफ हिस्टरी आॅफ टाइम’ या पुस्तकात वरील सर्व विषयांची सहज स्पष्टीकरणे आहेत. हे पुस्तक अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झाले आहे. त्याचप्रमाणे ‘माय ब्रीफ हिस्टरी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तकही प्रसिद्ध आहे. हॉकिंग बहुविकलांग असल्याने संगणकीय यंत्रणांखेरीज त्यांना आपले ज्ञान व्यक्तच करता आले नसते. त्यांना (आणि उर्वरित जगालाही) सहायक ठरलेल्या या तंत्रप्रणालींचा थोडक्यात परिचय...हॉकिंग बोलू शकत (म्हणजे त्यांचे विचार आपल्याला ऐकता येत असत) ते संगणकाधारित गुंतागुंतीच्या यंत्रणेद्वारे. हे बहुतेकांना माहीत असेलच. ही प्रणाली त्यांना इंटेल कॉर्पोरेशनने १९९७ पासून देऊ केली होती. ती चालवण्याचा, तिच्या देखभालीचा आणि ती अद्ययावत करण्याचा सर्व खर्चही आतापर्यंत इंटेलच करीत आली आहे. हिचे मूलभूत घटक म्हणजे टॅब, स्क्रीनवरचा सॉफ्टवेअर कीबोर्ड आणि हॉकिंगच्या चेहऱ्याच्या अगदी किरकोळ हालचालीही टिपणारा इन्फ्रारेड स्विच. या आणि इतरही आवश्यक त्या वस्तू हॉकिंग ह्यांच्या व्हीलचेअरवर आणि त्यांच्या शरीरावरही विविध ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. चाकांच्या खुर्चीच्या हातावर टॅब बसवलेला असायचा. त्याला ऊर्जा मिळायची ती खुर्ची चालवणाºया बॅटºयांकडूनच. परंतु स्वत:च्या इंटर्नल बॅटरीवरही तो काही तास चालू शकतो. हॉकिंग यांनी संगणकीय यंत्रणेशी संवाद साधण्याचे मुख्य माध्यम ऊर्फ इंटरफेस म्हणजे वडर््स प्लस कंपनीने लिहिलेला प्रोग्रॅम- ईझी कीज्. यामध्ये, वर सांगितल्याप्रमाणे, स्क्रीनवर दिसणारा सॉफ्टवेअर कीबोर्ड असायचा. एक कर्सर या स्क्रीनचे उभे-आडवे स्कॅनिंग सतत करीत असे. हॉकिंग यांना जे अक्षर निवडायचे असायचे, त्यावर, त्यांनी स्वत:ची मान किंचित हलवली की विशिष्ट संवेदकामार्फत, कर्सर थांबवला जात असे. यासाठी त्यांच्या उजव्या गालाची हालचाल नोंदवली जायची, त्यांच्या चष्म्याच्या काडीवर बसवलेल्या इन्फ्रारेड स्विचद्वारे. आहे की नाही संगणकीय अचूकतेची कमाल! या ईझी कीजमध्ये ‘वर्ड प्रेडिक्शन अल्गोरिदम’ समाविष्ट आहे. हातातील सेलफोनमध्ये असलेली डिक्शनरी. त्यामुळे शब्दाची पहिली एक-दोन अक्षरे लिहिली की पुढच्या विविध शब्दांचे पर्याय दाखवले जात. पूर्ण वाक्य तयार करण्यासाठी स्पीच सिंथसायझरची (विश्लेषक) मदत घेतली जायची. हा वेगळा हार्डवेअर सिंथसायझर स्पीच प्लसने तयार केला आहे. ईझी कीजद्वारे विंडोजच्या माउसचे नियंत्रणही हॉकिंग करीत असत.(लेखक संगणकतज्ज्ञ आहेत.)