शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:32 AM

पाकिस्तानचा कांगावा सुरूच, काश्मीरचा मुद्दा मांडणारच

न्यूयॉर्क : काश्मीरमध्ये भारताने चालविलेले अत्याचार थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय दबाव आणताना दिसत नाही. ही स्थिती पाहून आपण निराश झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या येथे आयोजिण्यात आलेल्या आमसभेला उपस्थित राहाण्यासाठी इम्रान खान आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टपासून तिथे संचारबंदी व अन्य निर्बंध लागू करण्यात आले होते. ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला यांच्यासह काही महत्त्वाचे नेते व फुटीरतावादी नेते, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.भारत काश्मिरी जनतेच्या हक्कांची गळचेपी करीत असल्याच्या पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने अजिबात महत्त्व दिले नाही. तरीही पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. ऐंशी लाखांपेक्षा जास्त ज्यू किंवा अगदी आठ अमेरिकी लोकांना जर कोंडून ठेवले असते, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरबाबत घेतली आहे, तशीच भूमिका त्यावेळी घेतली असती का, असा सवाल इम्रान खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, काश्मीरमधील निर्बंध हटवावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव आणलेला नाही. असे असले तरी काश्मीरमधील परिस्थितीचा मुद्दा पाकिस्तान यापुढेही मांडतच राहाणार. काश्मीरमध्ये ९० हजार सैनिक तैनात करण्याचे कारणच काय? संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आली की, काश्मीरमध्ये नेमके काय होणार आहे, हे देवालाच ठाऊक, असेही इम्रान खान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)काश्मिरी निमूटपणे निर्णय मान्य करतील?काश्मीरशी संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय तेथील लोक निमूटपणे मान्य करतील, असे वाटते काय, असे चिथावणीखोर उद्गारदेखील इम्रान यांनी काढले आहेत.ते म्हणाले की, भारताची मोठी बाजारपेठ व आर्थिक क्षमता यांच्याकडे पाहून जगातील अनेक देश काश्मीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.काश्मीरबाबत पाकिस्तान करीत असलेल्या वक्तव्यांना आंतरराष्ट्रीय समुदाय महत्त्व देत नाही, अशी खंतही इम्रान खान यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370