शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

परीक्षेच्या काळात इंटरनेट सेवाच केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:14 AM

विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केल्याच्या घटना भारतात सर्रास घडत असतात. त्याच्या बातम्यांचेही आता कोणाला आश्चर्य वाटत नाही.

अल्जियर्स : विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केल्याच्या घटना भारतात सर्रास घडत असतात. त्याच्या बातम्यांचेही आता कोणाला आश्चर्य वाटत नाही. पण जगात एक असाही देश आहे की, जिथे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण देशातच इंटरनेट बंद करण्यात आले.अल्जेरियामध्ये बुधवारपासून हायस्कूल विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथे कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी देशभरातील इंटरनेट सेवाच बंद करण्यात आली. परीक्षांचा पेपर होता दोन तासांचा; पण त्यासाठी देशात मोबाइल वा फिक्स्ड इंटरनेटची सेवा ठप्प होती. सरकारच्या आदेशानंतरच इंटरनेट सेवा थांबविण्यात आली, असे अल्जिरी टेलिकॉमने जाहीर केले आहे.देशात हायस्कूलमधील परीक्षा सुरू राहतील, तोपर्यंत ७ लाख विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.या परीक्षा येत्या सोमवारपर्यंत सुरू असतील. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली अल्जेरियामध्ये येथे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात कॉपी केली होती. त्या वेळी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न परीक्षेच्या आधीच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. >लोकांनी केला नाही विरोधत्यानंतर गेल्या वर्षीपासून अल्जेरियातील सरकारने सरकारने परीक्षेच्या काळात सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या सूचना आॅपरेटर्सना दिल्या होत्या; पण तेवढे करूनही प्रश्न सुटलाच नाही. त्यामुळे यावर्षी परीक्षेच्या काळात देशातील इंटरनेट सेवाच बंद करण्याचा सरकारने घेतला. याला पालकांनी विरोध केला नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रश्नच नव्हता. अनेकांना या निर्णयाचा त्रास निश्चितच झाला. मात्र, त्याबद्दल फारशी कटकट झाली नाही.