इस्लामाबाद : पाकिस्तानची चीनसोबत असलेली मैत्री हा आमच्या विदेश धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे, असे सांगतानाच चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (सीपीईसी) अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले.चीनचे विदेशमंत्री वांग यी यांच्या पाकिस्तान दौऱ्यात दोन्ही देशांनी योजना पूर्णत्वास नेण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही त्यांनी भर दिला. चीनचे विदेशमंत्री वांग यी हे तीन दिवसांच्या पाकिस्तान दौºयावर आले आहेत. त्यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली.ते म्हणाले की, पाकिस्तानच्या नव्या नेतृत्वासोबत सहकार्याचा विस्तार करण्याची आमची इच्छा आहे. पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हणाले की, चीनसोबत मैत्री हे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण आहे.
चीनशी मैत्री हा पाकच्या परराष्ट्र धोरणाचा भाग, पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:57 AM