हाँगकाँग : लोकशाहीवादी निदर्शक आणि पोलीस एकमेकांशी भिडल्याने हाँगकाँगमधील राजकीय पेच सोडविण्याच्या प्रयत्नांना हादरा बसला आहे. माँगकॉक जिल्ह्यातील मुख्य मार्गावर ठाण मांडणा:या लोकशाहीवादी निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमारासोबत मिरचीचा फवारा मारत तेथून हुसकावून लावले. यावेळी उडालेल्या चकमकीत 15 पोलीस जखमी झाले असून 26 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.
जवळपास 9 हजार निदर्शक या मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. बचावासाठी त्यांनी सोबत छत्र्या आणल्या होत्या. शुक्रवारी रात्रीपासून निदर्शकांनी माँगकॉकचा रस्ता धरला होता. पोलिसांना न जुमानता हा रस्ता कब्जात घेण्याचा निदर्शकांचा बेत होता; परंतु पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने वेळीच कारवाई करीत निदर्शकांचा हा मनसुबा हाणून पाडला. शनिवारी सकाळीही निदर्शकांनी या रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलक जोवर शांत होते, तोवर पोलीसही शांत राहिले. आंदोलक हिंसक झाल्यामुळे नाइलाजाने बळाचा वापर करावा लागला, असे हाँगकाँगचे पोलीस आयुक्त अँडी त्सँग यांनी सांगितले. दरम्यान, फेडरेशन ऑफ स्टुडंटचे नेते अॅलेक्स चौ यांनी सांगितले की, आमचे दोन्ही गट आणि सरकारने पुढच्या मंगळवारी चर्चा करण्याचे मान्य केले असून ही चर्चा रेडिओवरून थेट प्रक्षेपित केली जाईल. 2क्17 मध्ये हाँगकाँगच्या मुख्य प्रशासकपदासाठी निवडणूक होणार आहे. तथापि, उमेदवार चीन ठरविणार आहे. चीनच्या या निर्णयाच्या विरोधात लोकशाही समर्थकांनी महिनाभरापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (वृत्तसंस्था)