शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

आयफोन ७ घेताय ? मग जाणून घ्या हे तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 9:34 AM

अॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या आयफोन ७ चे मागच्या महिन्यात जोरदार लाँचिग झाले.पण...

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ - अॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या आयफोन ७ चे मागच्या महिन्यात जोरदार लाँचिग झाले. दर्जाच्या बाबतीत आयफोन अव्वल असल्याने वापरकर्त्यांना आयफोन ७ आणि ७ प्लसकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण आयफोन ७ आणि ७ प्लसकडून या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणावे तसे नावीन्यपूर्ण, क्रांतीकारी तंत्रज्ञान आयफोन ७ आणि ७ प्लसमध्ये नसल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. 
 
- आयफोन ७ आणि ७ प्लस बद्दल पहिली तक्रार किंमतीपासूनच सुरुवात होते.  32 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 53 हजार रुपये आहे. तर 64 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 61 हजार रुपये आणि 256 जीबीच्या आयफोनची किंमत 71 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याचसोबत 32 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 61 हजार रुपये, 128 जीबीच्या आयफोन 7 प्लसची 69 हजार आणि 256 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 79 हजार रुपयांच्या जवळपास आहे. 
 
-  अँड्राॅईड फोनशी आयफोनची तुलना केली तर, अँड्राॅईड वापरकर्त्यांना जास्त फायदे मिळतात. आधीच्या आयफोनशी तुलना करता ७ मध्ये फारसे काही नवीन नाही. 
 
- आयफोन ७ मध्ये IOS 10 सिस्टीम आहे,  ते IOS 9 चे अपडेटेड व्हर्जन आहे. त्यामुळे मोबाईलला फारसा फायदा होत नाही. 
 
- आयफोन ७ विकत घेणा-या अनेकांनी सिग्नल ड्रॉप आणि जीपीएस व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 
 
- गुगल मॅप वापरताना नो सिग्नल आयकॉन दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे,. 
 
-आयफोन ७ मध्ये जे नवे फिचर्स आहेत त्याला जास्तीत जास्त बॅटरी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात बॅटरीची समस्या देखील उदभवू शकते. आयफोन ७ ची बॅटरी आयफोन ६ च्या तुलनेत एक ते दोन तासच जास्त चालू शकते. 
 
 
- आयफोन ७ च्या रॅममध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, आयफोन ६ एस प्रमाणेच २ जीबी रॅम देण्यात आली आहे. 
 
- अॅपलने नव्या आयफोन ७ मध्ये वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. या इअरपॅडसच्या चोरी होण्याची शक्यता अधिक आहे. 
 
 - तुम्ही तुमच्या संगणकावरुन गाणी, फिल्म, व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये Transfer  करु शकता. पण आयफोनमध्ये सुलभतेने हे Transfer करता येत नाही. त्यासाठी आय टयुन्स सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर असणे आवश्यक आहे. 
 
 - सध्याचे बहुतेक मोबाईल डयुअल सीम आहेत. पण आयफोन अजूनही सिंगल सीम आहे. त्यामुळे काही आयफोन युझर्सना दुसरा फोनही सोबत कॅरी करावा लागतो. 
 
आयफोन ७ची वैशिष्टये
आयफोन 7ला 4.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच आयफोन 7मध्ये हेडफोन जॅकची सुविधा देण्यात आली नसून वायरलेस हेडफोननेच आयफोन 7 कनेक्ट होणार आहे. आयफोन 7मध्ये सुधारित 12 मेगा पिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला असून, कमी प्रकाशातही चांगली स्पष्टता देणार आहे. यात ड्युएल लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयफोन 7मध्ये सर्वाधिक जलद चालणारी नवीन ए10 चिफ बसवण्यात आली असून, 3 जीबीचा रॅम देण्यात आला आहे. तसेच 2.37GHZ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं सेन्सिटीव्ही होम बटण देण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोन ऑपरेटिंग करताना सुपरफास्ट चालणार आहे. या आयफोन 16 जीबीची किंमत 43 हजारांच्या घरात आहे. तर 32 जीबीच्या आयफोन 7ची किंमत 53 हजारांपर्यंत असणार आहे.
 
 
 कसा आहे आयफोन ६ 
अॅपलने आपले जुने फोन iPhone 6s आणि iPhone 6s Plus या फोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीत तब्बल 22 हजारांची कपात कंपनीने केली आहे.
 
आयफोन सिक्समध्ये ४.७० इंचाची टचस्क्रीन आहे तसेच आयफोन ६ मध्ये अॅपल A8 प्रोसेसर असून, १ जीबी रॅम आहे. या फोनचे इंटरनल स्टोरेज १६जीबी असून, त्यात वाढ होऊ शकत नाही. आयफोन ६ ला ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा असून, सेल्फीसाठी १.२ मेगा पिक्सल कॅमेरा आहे. आयफोन ८ ला आयओएस ८.० सिस्टीम आहे.