वॉशिंग्टन : इराणकडूनइस्रायलवर हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारतासह अवघे जग सतर्क झाले आहे. इराण येत्या दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सौदी अरेबिया, चीन, तुर्की आणि युरोपमधील अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून इराणला इस्रायलवर हल्ला करण्यापासून रोखण्यास सांगितले आहे. युद्ध चिघळल्यास सर्वांचेच मोठे नुकसान होईल, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. संघर्ष हिताचा नाही, असे अमेरिकेने म्हटले असून, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लॉर्ड कॅमेरून यांनीही इराणला वाद न वाढवण्याचा सल्ला दिला आहे.
हल्ला करण्यासाठी ‘एआय’चा वापर?इस्रायली सैन्याने गाझामधील हवाई हल्ल्यांसाठी हजारो मानवी लक्ष्यांची यादी तयार करताना चक्क एआय प्रणालीचा वापर केल्याचा आरोप एका स्वयंसेवी संस्थेच्या ९७२ या मासिकात हा दावा करण्यात आला. ‘लॅव्हेंडर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीचा वापर हमासच्या संशयित अतिरेक्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला.