शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणनं केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 19:48 IST

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी ईराणनं केली कारवाई

ठळक मुद्देआपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी इराणनं केली कारवाई२०१८ मध्ये सैनिकांचं करण्यात आलं होतं अपहरण

दहशतवाद्यांचं घर झालेल्या पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भारतानं नव्हे तर इराणनंपाकिस्तानच्या आत शिरून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तसंच त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन सैनिकांनाही त्यांनी मुक्त केलं. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण हा तिसरा देश आहे. यापूर्वी भारत आणि अमेरिकेनंही पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करत कारवाई केली होती. मंगळवारी रात्री इराणनं सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत दशतवाद्यांना कव्हर देणारे पाकिस्तानचे काही सैनिकही ठार झाले.इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनं (IRGC) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पाकिस्तानच्या सीमेतर आतवर शिरून हा सर्जिकल स्ट्राईक केला. तसंच त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असेलल्या आपल्या दोन सैनिकांनाही सोडवलं. पाकिस्ताननं अवैधरित्या कब्जा केलेल्या बलुचिस्तानमध्ये शिरून जैश-अल-अदलच्या ताब्यात असेलेल्या आपल्या सैनिकांना सोडवलं असल्याची माहिती IRGC नं दिली. IRGC नं यासंदर्भात एक अधिकृत माहिती देत या कारवाईला दुजोरा दिला. "आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाकिस्तानच्या आत शिरून आपल्या सैनिकांना सोडवलं आहे. दहशतवादी संघटनांकडून सैनिकांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर याविरोधात मंगळवारी कारवाई करण्यात आली," असं IRGC कडून सांगण्यात आलं. जैश उल-अदल अथवा जैश अल-अदल ही दशतवादी संघटना दक्षिण पूर्व इराणमध्ये सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनेनं यापूर्वी इराणमध्ये नागरी परिसरात आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले होते. याव्यतिरिक्त बलुचिस्तानमधील नागरिकांच्या नरसंहारासाठी त्यांना पाकिस्तानी लष्कराकडूनही समर्थन मिळतं. IRGC च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी ईराणच्या जवानांचं २०१८ मध्ये अपहरण केलं होतं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. परंतु आता सर्जिकल स्ट्राईकद्वारे त्यांना सोडवण्यात आलं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराणsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकterroristदहशतवादीSoldierसैनिक