Pakistan vs India - Iran: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय नजम सेठी यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत विचित्र दावा केला आहे. भारताच्या सांगण्यावरून इराणनेपाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते, असे त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले. भारताला इशारा देण्यासाठीच पाकिस्तानने इराणवर प्रत्युत्तराचा हल्ला केल्याचा दावाही त्यांनी केला. पण भविष्यासाठी कोणताही धोरणात्मक अडथळा निर्माण होऊ नये म्हणून इराणशी पाकिस्तान हातमिळवणी करत असल्याचाही दावा नजम सेठी केला. सेठी यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ या विधानावरून नजम सेठी यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.
काय म्हणाले नजम सेठी?
नजम सेठी यांनी न्यूज चॅनेलशी संवाद साधताना सांगितले की, "यामागे आमचा संशय आहे की इराण आणि भारत खूप जवळ आहेत. भारत आणि इराण यांच्यातील युतीचे दोन-तीन पैलू आहेत. त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले असावेत. भारताने त्यांना स्ट्राईकची कल्पना दिली असावी. पाकिस्तान प्रत्युत्तर देतो की नाही हे भारत तपासत आहे आणि पाकिस्तान प्रत्युत्तर देतो की नाही हे पाहण्यासाठी इराणकडून काम करून घेत आहे. त्यामुळे इराण आपल्या भावासारखा असूनही पाकिस्तानने अचूक उत्तर दिले आहे आणि ते तिथेच थांबवले, जेणेकरून ही गोष्ट पुढे जाऊ नये आणि भारताला योग्य तो संदेश मिळाला"
इराण भाऊ तर भारतला शत्रू!
नजम सेठी पुढे म्हणाले, "आमच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईने इराणला संदेश दिला नाही, तर तो भारताला संदेश आणि इशारा होता." यावर न्यूज अँकर म्हणाला आणि अफगाणिस्तानलाही प्रत्युत्तर दिले. यावर नजम सेठी म्हणाले, "हे बघा, अफगाणिस्तान नाही, कारण ते आमच्यावर क्षेपणास्त्रे डागत नाहीत. मुख्यतः हा भारतासाठी संदेश होता. हा एक प्रकारचा संदेश आहे. भारत आणि इराणच्या निवडणुकीपूर्वी त्यांना हा संदेश मिळणे गरजेचे होते. त्यांना शोषण करायचे आहे. आम्ही तसे होऊ देणार नाही. पाकिस्तानने दिलेले प्रत्युत्तर सर्वांसाठीच एक इशारा आहे," असे नजम सेठी म्हणाले.