वॉशिंग्टन - गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमालीचा वाढला आहे. दरम्यान, आज इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ड्रोन पाडून इराणने मोठी चूक केली आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेसोबतचा तणाव कायम असतानाच इराणने आज अमेरिकेचे एक शक्तिशाली ड्रोन होर्मुजजवळ पाडले होते. इराणच्या या कृत्यामुळे अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. इराणच्या या कृत्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी ट्विट करून इराणला इशारा दिला आहे. इराणने एक मोठी चूक केली आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
इराणने मोठी चूक केली, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने ट्रम्प संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:16 PM