शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

इराणची क्षेपणास्त्र चाचणी सुरूच

By admin | Published: March 10, 2016 2:50 AM

अमेरिकेचे इशारे न जुमानता इराणने क्षेपणास्त्र चाचणी सुरूच ठेवली आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही त्याच्या सुरक्षा दलाने दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा केला.

तेहरान : अमेरिकेचे इशारे न जुमानता इराणने क्षेपणास्त्र चाचणी सुरूच ठेवली आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही त्याच्या सुरक्षा दलाने दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा केला.कद्र-एच व कद्र-एफ या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. दीर्घ पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रांनी १,४०० कि. मी. वरील लक्ष्य अचूकपणे भेदले, असे वृत्त सरकारी माध्यमांनी रिव्होल्युशनरी गार्डचे जनरल हुसैन सलामी यांच्या हवाल्याने दिले. इराणच्या उत्तरेकडील अलब्रोझ पर्वतीय क्षेत्रातून ही क्षेपणास्त्रे सोडण्यात आल्याचे सरकारी वृत्तवाहिनीने प्रक्षेपण केले. इराणने मंगळवारीही अनेक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या होत्या. अमेरिकेने इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याच्यावर निर्बंध लादले होते. इराणवरील अणुकार्यक्रमाशी संबंधित निर्बंध उठविण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे पाऊल उचलण्यात आले होते, हे विशेष; मात्र या निर्बंधांना न जुमानता इराणने क्षेपणास्त्र चाचणी सुरू ठेवली आहे. इराणने केलेल्या चाचण्यांना आपण दुजोरा देऊ शकत नाही. तथापि, असे काही घडले असल्यास प्रत्युत्तरादाखल अमेरिका एकतर्फी किंवा आंतरराष्ट्रीय कारवाई करू शकतो, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले. आमचे शत्रू आमच्यावरील निर्बंध जेवढे वाढवतील तेवढी आमची प्रतिक्रिया तीव्र असेल, असे इराणियन लष्कराच्या हवाई शाखेचे प्रमुख जनरल आमिर अली हजिझादेह यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)