तेहरान:इराणमध्ये(Iran) कोरोना लसीकरणावरुन(Corona Vaccination) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार्यक्रमात भाषण देत असताना एका पूर्व अझरबैजान राज्याच्या राज्यपालांना स्टेजवरच एका व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित लोकही चकीत झाले. हा सर्व प्रकार कशामुळे घडला, कुणालाही काही कळालं नाही. पण, नंतर चौकशीत एक आश्चर्यकारक माहिती समोर आली.
द गार्जियनच्या वृत्तानुसार, ब्रिगेडियर आबेदीन खोर्रम यांना अलीकडेच इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. एका कार्यक्रमात ते भाषण देत होते, तेवढ्यात एक माणूस स्टेजवर आला आणि त्याने आबेदीन खोर्रमला जोरदार चापट मारली. या चापटीचा आवाज माइकमधून सभागृहात पसरला. या अचानक झालेल्या घटनेमुळे कुणालाच काही कळालं नाही. पण, नंतर चौकशीत हल्लेखोराने या कृत्याचे कारण सांगितले.
यामुळे मारली चापट...
राज्यपालांवर हल्ला होताच सुरक्षा कर्मचारी तत्काळ मंचावर पोहोचले आणि त्यांना सुरक्षित पडद्यामागे नेले. त्याच वेळी, उर्वरित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरावराला बाहेर नेले. काही वेळानंतर राज्यपाल पुन्हा मंचावर आले आणि त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीदरम्यान हल्लेखोराने सांगितले की, एका पुरुषाने पत्नीला कोरोनाची लस दिली होती. त्यावेळी त्याने पत्नीला स्पर्श केला. याचा त्याला खूप राग आला आणि सरकारचा प्रमुख म्हणून राज्यपालांना चापट मारली, अशी माहिती त्यांने दिली.
'मी त्याला माफ केलं'आपल्या भाषणावेळी राज्यपाल खोर्रम म्हणाले, 'मी त्याला अजिबात ओळखत नाही, पण तुम्ही कदाचित त्याला ओळखत असाल. जेव्हा मी सिरियात होतो, तेव्हा माझे शत्रू मला दिवसातून 10-10 वेळा मारहाण करायचे. ते माझ्या डोक्यावर बंदूक धरायचा. तरीही मी त्यांना क्षमा केली. त्यामुळे ज्या व्यक्तीने मला चापट मारली त्याला मी क्षमा करत आहे.