इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात पकडण्यात कथित भारतीय ‘हेरा’चा संबंध येथील माध्यमांनी इराणशी जोडल्याने इराण सरकार संतप्त झाले आहे. अशा वृत्तामुळे उभय देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधावर ‘नकारात्मक परिणाम’ होईल, असा इशारा इराणने पाकिस्तानला दिला आहे.अटक करण्यात आलेले कथित भारतीय हेर कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसाय करीत होते. त्यामुळे त्यांच्या कारवायांना इराणचे समर्थन असल्याचा संकेत देणारे वृत्तान्त येथील प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इराणने हा इशारा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारनेही आपल्या माध्यमांना यावर वार्तांकन करताना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अलिखान म्हणाले की, इराण आणि पाकिस्तान यांच्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध आहेत.
भारतीय ‘हेरा’वरून इराण-पाक तणाव
By admin | Published: April 04, 2016 2:43 AM