शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 2:07 PM

जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे.

इराणनं त्यांचा कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलविरोधात एक खतरनाक प्लॅन बनवला आहे. इराणनं आत्मघाती हल्ल्याच्या माध्यमातून इस्त्रायला हादरवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी अफगाणी दहशतवाद्यांची भरती करत आहे. सूत्रांनुसार, अफगाणी दहशतवाद्यांकडून इस्त्रायलवर आत्मघाती हल्ले केले जातील. गाझा युद्ध आणि सीरियातील इस्त्रायली स्ट्राईकनं भडकलेल्या इराणनं जगभरातील इस्त्रायली ठिकाणांना टार्गेट करण्याचं प्लॅनिंग केले आहे. इराण इस्त्रायलवर आत्मघाती हल्ले करू शकते. त्यासाठी ही प्लॅनिंग करण्यात येत आहे. 

सूत्रांनुसार, जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे. आयआरजीएसच्या फोर्सची ४०० इस्त्रालयी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.ज्याठिकाणी हे आत्मघातकी हल्ले करण्याची योजना आहे. त्यासाठी बेकायदेशीरपणे अफगाणी दहशतवाद्यांना भरती केले जात आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या स्ट्राईकनं संतापलेल्या इराणनं बदला घेण्याचं ठरवलं आहे. 

मीडिल ईस्टच्या अमेरिकन ठिकाणांवरही इराणच्या प्रॉक्सी संघटनांकडून सातत्याने हल्ला होत असून त्यामुळे इस्त्रायल, अमेरिकेच्या प्रत्युत्तराने भीषण युद्धाचे संकेत दिसत आहेत. सीरियाचा इराणी कमांडरचा मृत्यू झाल्याने इब्राहिम रईसीने महायुद्धाचे संकेत दिलेत. इराणी कमांडर सैयद रजी मोसावीच्या सीरियातील हत्येनंतर पूर्ण इराणमध्ये जबरदस्त आक्रोश आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री उघडपणे इस्त्रायलला उद्ध्वस्त करू अशी धमकी देत आहेत. मोसावीच्या हत्येनंतर इराणमध्ये ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. त्यामुळे इराण बदला घेण्याची योजना आखत आहे. 

भारतापर्यंत पोहचली युद्धाची झळगेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचली आहे. तांबडा समुद्र सध्या युद्धभूमी बनला आहे. इराण समर्थक हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हमासला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या हुतींनी जाहीर केले आहे की, जे जहाज इस्रायलला जात आहेत किंवा इस्त्रायलशी संबंधित आहे, त्यांना ते लक्ष्य करतील. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराण