तेहरान- इराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्य़ात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इराम यांचे संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर इराण अनेक मार्गांनी आपली संरक्षणसिद्धता दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अमेरिकेची पाठ वळताच चीनची इराणमध्ये घुसखोरीअमेरिकेने इराणबरोबरचा करार रद्द केल्यानंतर चीनने इराणशी संबंध वाढवायला सुरुवात केली आहे.जून 2017पर्यंत चीनने 33 अब्ज डॉलर्सची इराणमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच पाणीपुरवठा, ऊर्जा, वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी 10 अब्ज डॉलर्सची मदतही चीनने इराणी बँकांना केली आहे. तसेच बुशहेर या बंदरापासून इराणमधील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी 70 कोटी डॉलर्सची मदतही चीनने केली आहे. इराणमधील नैसर्गिक वायूक्षेत्रातून फ्रेंच कंपनीने माघार घेतली तर त्याची जागा घेण्यासाठी चीन तयारच आहे. चीन हा क्रूड ऑइल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. इराण हा चीनला तेलाची निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचा सर्वात जास्त तोटा युरोपियन कंपन्यांना होणार आहे.