शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
2
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
3
संपादकीय: अभिजात मराठी!
4
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
5
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
6
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
7
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
9
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
10
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
11
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
12
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
13
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
15
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
16
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
17
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
18
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
19
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
20
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 7:23 AM

Iran Vs Israel: इस्रायलला संपविणे गरजेचे; इराणचे नेते खोमेनी यांचा इशारा; अरब देशांनी एकत्र यावे

तेहरान/जेरुसलेम/बेरुत : इस्रायलवर मंगळवारी करण्यात आलेला क्षेपणास्त्र हल्ला ही खूप लहान शिक्षा हाेती. गरज पडली तर पुन्हा हल्ला करू, असा इशारा इराणचे सर्वाेच्च नेते अली खोमेनी यांनी दिला. इस्रायल कधीही हमास आणि हिजबुल्लाला पराभूत करू शकणार नाही. इस्रायलला संपिवणे आवश्यक असून, त्यासाठी अरब देशांना एकत्र येण्याचे आवाहनही खामेनी यांनी केले. तर, इस्रायलने हल्ला केल्यास आधीपेक्षा आणखी तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांनी दिला आहे. ते लेबनानमध्ये बाेलत हाेते.

हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याला इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले. त्यावेळी इराणमध्ये खोमेनी यांनी शुक्रवारी नमाज अदा केली. त्यानंतर त्यांनी लाेकांना संबाेधित केले. खामेनी यांनी जानेवारी २०२०नंतर प्रथमच शुक्रवारच्या नमाजचे नेतृत्त्व केले. त्यावेळी इराणच्या रिव्हाॅल्यूशनी गार्ड्सचे जनरल कासिम सुलेमानी याच्या मृत्यूनंतर ते उपस्थित झाले हाेते. गेल्या वर्षी ७ ऑक्टाेबरला हमासच्या नेतृत्त्वाखाली झालेला हल्ला पॅलिस्टिनी नागरिकांसाठी केलेली वैध कारवाई हाेती. तर, मंगळवारी केलेला क्षेपणास्त्र हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, देशाचा कायदा आणि इस्लामिक मान्यतेवर आधारित हाेता, असे खामेनी यांनी म्हटले. दरम्यान, हिजबुल्लाचा संपर्कप्रमुख माेहम्मद स्केफी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. (वृत्तसंस्था)

मुख्य रस्ता उद्ध्वस्त; रसद तोडण्याचा प्रयत्नnलेबनाॅन आणि सीरियाला जाेडणारा प्रमुख रस्ता उद्ध्वस्त करण्यात इस्रायलला यश आले. याशिवाय लेबनाॅन-सीरियाला जाेडणाऱ्या ३.५ किलाेमीटर लांबीचा सुरुंग हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आला. nयाद्वारे इराणची शस्त्रे हिजबुल्लाला लेबनाॅनमध्ये पुरविण्यात येत हाेती. संघर्ष सुरु झाल्यानंतर प्रथमच एखाद्या प्रमुख मार्गाला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. रसद माेडण्याचा प्रयत्न इस्रायलने केला आहे.

भारताकडून चिंता व्यक्तइस्रायल-इराण वाढत्या तणावावरून भारताने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र प्रवक्ता रणधीर जायस्वाल यांनी सांगितले की, लाेकांच्या सुरक्षेसाठी इस्रायल आणि इराणसाठी उड्डाणे सुरू आहेत, जेणेकरून लाेकांना या देशांमधून भारतात परतता येईल.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल