वॉशिंग्टन : इराणमधील इस्लामिक क्रांतीच्या काळातील ४०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज आणि त्यावरील १.३ अब्ज डॉलर्सचे व्याज अमेरिका इराणला देणार आहे. ही माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी रविवारी येथे दिली. या रकमेसाठी इराणने आंतरराष्ट्रीय लवादाकडे अर्ज केला होता. तो खटला अशा पद्धतीने मिटविण्यात आला आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी या तडजोडीने हे प्रकरण मिटविण्याचे दूरचित्रवाणीवर केलेल्या निवेदनात समर्थन केले. इराणला जेवढी रक्कम हवी होती त्यापेक्षा ही किती तरी कमी आहे, असे ओबामा म्हणाले. इराणने जर पाठपुरावा केला असता जेवढे डॉलर्स द्यावे लागले असते त्यात या तडजोडीमुळे अब्जावधी डॉलर्सची बचत झाली आहे, असे ओबामा म्हणाले. हे प्रकरण वाढविण्यात अमेरिकेचा कोणताही फायदा नव्हता, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
गोठवलेले अब्जावधी डॉलर्स इराणला मिळणार
By admin | Published: January 19, 2016 3:03 AM