इऱाणमध्ये एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार होती. पण फाशी देण्याच्या काही वेळाआधीच तिचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. यानंतर महिलेचा मृतदेहच फासावर लटकवण्यात आला. thetimes.co.uk च्या रिपोर्टनुसार, जहरा इस्मायली नावाच्या महिलेला तिचा पती अलीरेजा जमानीच्या हत्येबाबत दोषी ठरवण्यात आलं होतं. आणि इराणच्या कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती.
रिपोर्टनुसार, जहरा इस्माइलीचे वकील ओमिद मुरादीने सांगितले की, महिलेच्या मृत पतीच्या आईला खूश करण्यासाठी तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला. वकिलाने असेही सांगितले की, जहराचा पती दुर्व्यवहार करत होता आणि महिलेने स्वत: आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हे कृत्य केलं होतं. वकिलाने सांगितलं की, जहराचा पती इराण गुप्तचर मंत्रालयात काम करत होता. (हे पण वाचा : बोंबला! जबरदस्ती किस करत महिलेने दाताने तोडली त्याची जीभ, ती पक्षी घेऊन गेला अन् खाऊन टाकली.....)
वकिलाने सांगितले की, जहराला तिच्या कृत्यासाठी फाशी देण्यासाठी लाइनमध्ये उभं करण्यात आलं होतं आणि तिच्यापुढे फाशी दिले जाणारे १६ पुरूष होते. त्यांना फाशी देतेवेळी जहरा तिथेच उभी होती. तिला सर्वांना फाशी देताना उघड्या डोळ्यांनी बघण्यासाठी भाग पाडण्यात आलं. या धक्का तिला बसला आणि हार्ट अटॅक आला. (हे पण वाचा : मै हू ना! शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेत शिकवले; वयात येताच पळून जात लग्न केले)
असे सांगितले जात आहे की, इराणची राजधानी तेहरानपासून ३२ किमी दूर अंतरावर असलेल्या एका तुरूंगात जहरा आणि १६ इतर पुरूषांना फाशी देण्यात आली. वकिलाने सांगितलं की, जहराचा मृतदेह फासावर लटकवण्यात आलं जेणेकरून तिच्या पतीच्या आईला जहराच्या मृतदेहाखाली ठेवण्यात आलेल्या खुर्चीला लाथ मारता यावी. जगात सर्वात जास्त फाशी दिली जाण्यासाठी इराण हा देश चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.