शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:49 AM

इब्राहिम रईसी व अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष आलियेव यांच्याहस्ते रविवारी एका धरणाचे उद्घाटन केले. तेथून परतताना इराणच्या सीमेजवळ त्यांचे हेलिकॉप्टर रात्री कोसळले.

दुबई : इराणच्या वायव्येकडील डोंगराळ भागात रविवारी रात्री झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातराष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (वय ६३) यांच्यासह परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दोल्लाहियान, काही अधिकारी व अंगरक्षकांचा मृत्यू झाला. इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वात व राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या आदेशानुसार गेल्या महिन्यात इराणच्या सैन्याने इस्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला चढविला होता.इब्राहिम रईसी व अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष आलियेव यांच्याहस्ते रविवारी एका धरणाचे उद्घाटन केले. तेथून परतताना इराणच्या सीमेजवळ त्यांचे हेलिकॉप्टर रात्री कोसळले. इसायलशी सुरू केलेला संघर्ष, अमेरिकेबरोबर वाढलेले शत्रुत्वाच्या काळात हेलिकॉप्टर दुर्घटना होऊन राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू होणे हा इराणसाठी मोठा धक्का आहे. रईसी यांचा अपघाती मृत्यू धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी उमटली आहे. इजिप्त, जॉर्डन, सीरिया या देशांनीही इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच यानिमित्त भारताने उद्या, मंगळवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.  

अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यातरविवारी रात्री झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. तुर्कस्थानच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी एक ड्रोन फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले. 

मोहम्मद मोखबर हंगामी राष्ट्राध्यक्षइराणचे उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोखबर यांची हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी निवड केली. रईसी यांच्या मृत्यूनंतर खामेनी यांनी ही घोषणा केली. 

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्तइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. इराण-भारतातील संबंध दृढ होण्यात रईसी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. 

तेलाच्या, सोन्याच्या किमतीत वाढनवी दिल्ली : इब्राहिम रईसी यांच्या अकस्मात मृत्यूमुळे खनिज तेल व सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्याची किंमत १.१ टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस २४४०.५९ डॉलरवर पोहोचली आहे.

टॅग्स :IranइराणPresidentराष्ट्राध्यक्षAccidentअपघातHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना