इराणने हमासचा प्रमख इस्माईल हानियाच्या हत्येचा तपास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने तेहरानमधील आयआरजीसी कुद्स फोर्स संचालित गेस्ट हाऊसमध्ये वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दोन डझनहून अधिक लोकांना अटक केली आहे. या गेस्ट हाऊसमध्ये इस्माईल हानिया हत्या करण्यात आली होती. दरम्यान, इस्माईल हानियाच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या हमास प्रमुख इस्माईल हानियाची बुधवारी हत्या करण्यात आली होती. प्राथमिक रिपोर्टमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात इस्माईल हानियाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्यानंतर सूत्रांनी पुष्टी केली की, गेस्ट हाऊसमध्ये बॉम्ब ठेवून इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली. इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इस्माईल हानिया हा इराणची राजधानी तेहरान येथे गेला होता. त्यावेळी इराणी लष्कर आयआरजीसीच्या गेस्ट हाऊसमध्ये हानियाची हत्या करण्यात आली.
इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे इराण संचालक अली वाझे म्हणाले, "इराण आपल्या मातृभूमीचे किंवा त्याच्या प्रमुख मित्र देशांचे रक्षण करू शकत नाही, ही धारणा घातक ठरू शकते." तसेच, मध्यपूर्व आणि इराण या दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इस्माईल हानिया, ज्या गेस्टहाऊसमध्ये होता. त्या गेस्टहाऊसमध्ये दोन महिने आधीच बॉम्ब ठेवले होते. दरम्यान, इराणी अधिकारी आणि हमासने बुधवारी झालेल्या इस्माईल हानियाच्या हत्येला इस्रायल जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
"इराण आपल्या मातृभूमीचे रक्षण करू शकत नाही किंवा त्याचे प्रमुख सहयोगी देखील घातक ठरू शकत नाहीत," असे अली वाझे म्हणाले, मध्य पूर्व आणि इराण या दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय संकट गटाचे अधिकारी, एजन्सीने सांगितले की हा प्राणघातक स्फोट ए हानिया येण्याच्या दोन महिने आधी तिच्या खोलीत बॉम्ब पेरला होता. इराणी अधिकारी आणि हमास यांनी बुधवारी या हत्येला इस्रायल जबाबदार असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर सर्वात भीषण हल्ला झाला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. त्यावेळी अनेक निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची योजना इस्माईल हानियानं आखल्याचा आरोप होता. त्यामुळे इस्रायलने हमासच्या अनेक ठिकाणावर हल्ले करण्यास सुरुवात केली. अखेर इराणमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाला संपवलं. मात्र, इस्माईल हानियाच्या मृत्यूमागे आपला हात असल्याचे इस्रायलने कबूल केलेले नाही.
दोन इराणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या हेरगिरीसाठीच्या विशेष गुप्तचर युनिटने तपास हाती घेतला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, इस्माईल हानियाच्या हत्येचा कट रचणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि हत्या घडवून आणणाऱ्या सदस्यांचा शोध घेतला जाईल, अशी आशा गुप्तचर युनिटला आहे.