ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 7- हेरगिरी करणारा इराणचा अणू शास्त्रज्ञ शहराम अमिरी याचा गुप्तरीत्या मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने 2010मध्ये हेरगिरी करताना त्याला अटक केले होते. त्यानंतर त्याला इराणला परत पाठविण्यात आले. त्यानंतर तो रहस्यमयरीत्या गायब झाला होता. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमिरी याला याच आठवड्यात गुप्तरीत्या फाशी दिली गेली आहे.
अमिरीच्या मृतदेहाच्या गळ्याला फास लावल्याचा खुणा होत्या. त्यामुळे त्याला फाशी देण्यात आली असावी, अशी माहिती त्याच्या आईनं दिली आहे. अमिरीचा 1977मध्ये जन्म झाला होता. त्यानंतर 2009साली गेलेल्या मक्का यात्रेत तो बेपत्ता झाला होता. तो इराणमधला नावाजलेला अणू शास्त्रज्ञ होता.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं अटक केल्यानंतर त्यासंदर्भात एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याला एका निर्जनस्थळी ठेवले असून, भूल देणारनं इंजेक्शन दिल्याचं त्यानं सांगितले होते.