Iraq attacks US Military base in Syria: इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेतून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराकने सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट डागले. इराकच्या जुम्मर शहरातून रविवारी ईशान्य सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर किमान पाच रॉकेट डागण्यात आली, असे दोन इराकी सुरक्षा सूत्रांनी सांगितले. इराकमध्ये इराणला पाठिंबा देणाऱ्या गटांनी अमेरिकन सैनिकांवरील हल्ले थांबवले होते. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासून अमेरिकन सैन्यावर झालेला हा पहिला हल्ला आहे. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतल्यानंतर एका दिवसाने हा हल्ला करण्यात आला.
सूत्रांनी आणि लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीरियाच्या सीमावर्ती शहर झुम्मरमध्ये एका छोट्या ट्रकच्या मागे रॉकेट लाँचर बसवलेले होते. लष्करी अधिका-याने सांगितले की, लढाऊ विमाने आकाशात असताना, फायर न केलेल्या रॉकेटच्या स्फोटामुळे ट्रकला आग लागली. एका लष्करी अधिकाऱ्याने या घटनेच्या संवेदनशीलतेमुळे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जोपर्यंत आम्ही तपास करत नाही, तोपर्यंत आम्ही खात्री करू शकत नाही की ट्रकवर अमेरिकन लढाऊ विमानाने बॉम्ब टाकला होता की नाही.
झुम्मर शहरातील एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, इराकी सुरक्षा दलांना या भागात तैनात करण्यात आले होते आणि त्यांनी दुसऱ्या वाहनाचा वापर करून परिसरातून पळून गेलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील तपासासाठी ट्रक जप्त करण्यात आला असून प्राथमिक तपासात तो हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचे समजते.
या हल्ल्याची माहिती देण्यासाठी आम्ही इराकमधील गठबंधन असलेल्या दलांशी संवाद साधत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी पहाटे इराकमधील लष्करी तळावर झालेल्या मोठ्या स्फोटात इराकी सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाल्याच्या एका दिवसानंतर हे हल्ले झाले. यामध्ये इराणला पाठिंबा देणाऱ्या गटांचाही समावेश होता.