शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भारताविरुद्ध युद्धाचा इराकी बंडखोरांचा इशारा

By admin | Published: July 03, 2014 5:07 AM

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) या संघटनेचा कथित कमांडर इब्राहिम आवाद अल बद्री याने रमजाननिमित्त भाषण करताना अनेक देशांविरोधात युद्ध पुकारण्याची घोषणा केली

बगदाद : इराकमधील सुन्नी बंडखोरांच्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) या संघटनेचा कथित कमांडर इब्राहिम आवाद अल बद्री याने रमजाननिमित्त भाषण करताना अनेक देशांविरोधात युद्ध पुकारण्याची घोषणा केली असून, त्यात भारताचेही नाव घेतले आहे. आयएसआयने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या जाहीरनाम्यात भारताचा उल्लेख आल्याने इराकमध्ये सशस्त्र संघर्ष चाललेल्या भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अल बद्री म्हणजेच सुन्नी बंडखोरांचा नेता अबू बकर अल बद्री असून, त्याने रमजाननिमित्त केलेल्या भाषणात हे आवाहन केले आहे. अल बद्रीचे हे भाषण रशियन, इंग्रजी , फ्रेंच, अल्बानियन व अरेबिक भाषात उपलब्ध करण्यात आले आहे. जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावे, असा हा इशारा आहे. इराकमधील राजकीय नेत्यांना सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात अपयश आले असून, सुन्नी व कुर्द संसद सदस्य अनुपस्थित राहिल्याने नव्या सभापतींची निवड करणे शक्य झालेले नाही. सुन्नी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांना तिसरा कार्यकाळ मिळणे कठीण आहे. इराकमधील या संकटाने लाखो लोक बेघर झाले असून, इराक शिया, सुन्नी व कुर्द गटात विभागला गेला आहे. कुर्द सांसद नजीबा नजीब यांनी इराकी सरकारने स्वायत्त कुर्दचे बजेट मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)