इस्रायल आणि फिलिस्तीनमध्ये भीषण संघर्ष सुरु झाला असून त्या भागातील राजकारण बदलू लागले आहे. ज्यू विरुद्ध मुस्लिम देश एकत्र आले आहेत. यातच दोन देशांनी या देशांशी फारकत घेत इस्रायलला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलला अमेरिका, भारत, ब्रिटनसारख्या ताकदवान देशांचा पाठिंबा लाभलेला आहे. यामुळे आता इस्रायलविरोधात दुश्मन देशांनी कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे.
इस्रायलचे दोन कट्टर दुश्मन इराण आणि सौदी अरेबियाने जवळपास पाऊन तास या युद्धावर चर्चा केली आहे. सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी बुधवारी फोनवरून ही चर्चा केली. यावेळी त्यांनी फिलिस्तीनच्या आजुबाजुचा तणाव कमी करण्यावर चर्चा केली आहे. इराणवर हमासला हल्ल्यासाठी मदत केल्याचा आरोप लावण्याच आला आहे. यावेळीच ही चर्चा झाली आहे.
चीनच्या मदतीने दोन्ही देशांमध्ये नुकतेच राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. परंतू पहिल्यांदाच या देशांच्या नेतृत्वाने फोनवरून चर्चा केली आहे. सौदी प्रेस एजन्सीने वृत्त दिले आहे की, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना इराणचे अध्यक्ष रायसी यांनी फोन केला होता. सौदी क्राउन प्रिन्सने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या तत्त्वांचे पालन करण्यावर भर दिला आहे. यासोबतच जाणीवपूर्वक नागरिकांना लक्ष्य केल्याचा निषेधही त्यांनी केला.
गाझा पट्टीतील मानवतावादी परिस्थितीवरही दोन्ही देशांदरम्यान चर्चा झाली आहे. या भागातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे तेथील रहिवाशांबाबत दोन्ही देशांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही नेत्यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या कल्याणासाठी सामायिक चिंता व्यक्त केली. तसेच वेदना आणि हिंसा संपवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.