ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटनांपैकी एक इसिसमधील एका दहशतवाद्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी अमेरिकन पासपोर्टवर काठमंडूमार्गे भारतात येत होता. काठमंडू विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. त्या दहशतवाद्याकडे भारतातील व्यक्तींचे नंबर आणि काही कागदपत्रे मिळाली आहेत. काठमंडू विमानतळावर पकडण्यात आलेल्या इसिसच्या दहशतवाद्याची अमेरिकन गुप्तचर संघटना कसून चौकशी करत आहे. त्या दहशतवाद्याचा भारतात येण्याचा हेतू काय आहे ते अद्याप समजले नाही. दरम्यान, इराक येथे दहशतवादी संघटनेत फसलेले 33 भारतीय मायदेशी परतले आहेत. त्यातील 32जण हे तेलगंनाचे तर एक जण आंध्रप्रदेशातील आहे. हे 33 जण इराक एरबीएलमध्ये फसले होते, या सर्व 33 जणांना भारतीय सरकराच्या मदतीने वाचवण्यात आले आहे.
भारतात येणाऱ्या ISISच्या दहशतावाद्याला काठमांडूत अटक
By admin | Published: April 03, 2017 12:54 PM