शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

ब्रुसेल्सवर इसिसचा हल्ला

By admin | Published: March 23, 2016 4:29 AM

बेल्जियममध्ये ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

ब्रुसेल्स : बेल्जियममध्ये ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांनंतर जगभरातील विमानतळांवर अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास जेवेन्तम विमानतळाच्या मुख्य कक्षात दोन स्फोट झाले. त्यानंतर काही वेळातच युरोपीय संघाच्या मुख्य इमारतीजवळ मालबिक मेट्रो स्टेशनवर तिसरा स्फोेट झाला. कार्यालयीन वेळ असल्याने मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी होती. तर विमानतळावरही चेक इन करण्यासाठी हजारो प्रवासी प्रतीक्षेत होते. अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्यांनी पॅरिसमध्ये नोव्हेंबर महिन्यात १३० जणांचे बळी घेणाऱ्या हल्ल्यानंतर चार महिन्यांनी यातील प्रमुख संशयित सालेह अब्देसलाम याला शुक्रवारी नाट्यमयरीत्या अटक झाली. त्यानंतरच हे स्फोट झाले आहेत. दरम्यान, फ्रान्समध्ये १६०० अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, बेल्जियमचे विदेश मंत्री दिदिएर रेंडर्स यांनी असे म्हटले आहे की, अब्देसलाम अशा प्रकारचे नवे हल्ले करण्याची योजना आखत होता. या हल्ल्यातील संशयित फरार झाले असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सांगितले की, विमानतळावर झालेल्या हल्ल्यात १५ जण ठार तर मेट्रो स्टेशनवरील हल्ल्यात २० जण ठार झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार आपत्कालीन विभागाचे कर्मचारी रक्तबंबाळ झालेल्या जखमी नागरिकांवर उपचार करताना दिसत होते. दरम्यान, स्फोटांच्या पार्श्वभूमीवर विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य संशयित सालेह अब्देसलाम याला शुक्रवारी नाट्यमयरित्या अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले झाले आहेत. गृहमंत्री जेन जेम्बोन यांनी सांगितले की, देशात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठकही बोलाविण्यात आली आहे. शेजारी राष्ट्र असलेल्या फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँडसह ब्रिटनमध्येही विमानतळांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ब्रुसेल्समध्ये यूरोपीय संघाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालय अथवा घरातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. येथे २८ देशांच्या यूरोपीय संघाचे मुख्यालय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स माइकल यांच्याशी संपर्क साधून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार नरेंद्र मोदी ३0 मार्च रोजी बेल्जियमला जाणार आहेत. या हल्ल्यानंतरही त्या कार्यक्रमात बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले.———————...........विमानतळावर गोंधळ...ब्रुसेल्समध्ये राहणारी ब्रिटीश पत्रकार शार्लोट मॅक्डोनाल्ड गिब्सनने सांगितले की, विमानतळावर पूर्णपणे गोंधळ उडाला होता. ही पत्रकार येथे नाष्टा करत होती. अचानक काही कर्मचारी तिथे आले आणि सांगितले की, तुम्हाला येथून बाहेर जावे लागेल. उपस्थित सर्वच संभ्रमात होते. काय होत आहे हेच कुणाला कळत नव्हते...............———————सर्वस्तरातून निषेध........- हा तर युरोपच्याविरोधात हल्ला आहे, अशा शब्दात स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी व्टिट केले आहे की, या हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सर्वोतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. - या हल्ल्याने अतिरेक्यांकडून होणारा आणखी एक हिंसाचार जगासमोर आला आहे, अशा शब्दात यूरोपीय संघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी संताप व्यक्त केला आहे. .............हा तर युरोपवरील हल्ला : ओलांद या हल्ल्यांनतर बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद म्हणाले की, ब्रुसेल्सवरील हल्ला हा पूर्ण युरोपवरील हल्ला आहे. अतिरेक्यांचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण युरोपला आता ठोस पाउले उचलण्याची गरज आहे. .........याचि देही...थायलंडहून आलेल्या आपल्या पत्नीला तनकरात पाई तरानला विमानतळावर रिसिव्ह करण्यासाठी आलेल्या ज्यां पियरे हर्मन यांनी हा थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले की, विमानतळावर माझी पत्नी दिसताच मी तिला हॅलो म्हणालो. आम्ही लिफ्टमध्ये पाय ठेवताच पहिला बॉम्बस्फोट झाला. तेथून बाहेर पडताच दुसरा स्फोट झाला. आपत्कालिन दरवाजाकडे आम्ही पळालो. आम्ही सुखरुप बाहेर पडलो हे आमचे भाग्य, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ..............मेट्रोसेवा बंदब्रुसेल्समधील मेट्रो रेल्वेसेवा बंद करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वेस्थानकावर ऐन वर्दळीच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. स्थानकाच्या प्रवेशद्वारातून येत असलेल्या धुराच्या लोटाची छायाचित्रे स्थानिक टी.व्ही.वर दाखविण्यात आली. ..........आत्मघातकी हल्लेखोर? बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स माइकल यांनी या हल्ल्यांना हिंसक आणि क्रूर असे संबोधले आहे. ते म्हणाले की, हा काळा दिवस आहे. जेवेन्तम विमानतळावर हे दोन स्फोट भारतीय वेळेनुसार ११.३० वाजता झाले. एका आत्मघातकी हल्लेखोराकडून हा हल्ला झालेला असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ..........गायक अभिजितच्या पत्नी, मुलांची सुखरूप सुटकाया विमानतळावर प्रसिद्ध भारतीय गायक अभिजीत भट्टाचार्य याची पत्नी व मुलगाही अडकले होते. खुद्द अभिजीतनेच यासंदर्भात ट्विट केले आहे. आत्ताच माझे पत्नी व मुलाशी बोलणे झाले, ते सुखरूप आहेत. त्यांची सुटका करण्यात येत असून त्यांना एका सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे. थँक्स जेटएअरवेज,असे ट्विट त्याने केले आहे...........