अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आता इस्कॉनने (Iskcon) मोठा दावा केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव दैवी कृपेने वाचल्याचे इस्कॉनने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात बोलताना इस्कॉनने म्हटले आहे, आजपासून बरोबर 48 वर्षांपूर्वी ट्रम्प हे जगन्नाथ रथयात्रेसाठी एक आशेचा किरण बनून समोर आले होते. आज जगभरात पुन्हा एकदा जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव सुरू आहे. अशात, भगवान जगन्नाथ यांनी ट्रम्प यांचे रक्षण केले, असे म्हटले जाऊ शकते.
सोशल मीडिया पोस्टमध्ये इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास म्हटले, ट्रम्प यांनी 1976 मध्ये रथांच्या निर्मितीसाठी कुठलेही शुल्क न घेता, ट्रेन यार्ड उपलब्ध करून दिले होते आणि इस्कॉन भक्तांना रथयात्रेच्या आयोजनात मदत केली होती. जेव्हा आज संपूर्ण जग नऊ दिवसांच्या जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव साजरा करत आहे, अशात त्यांच्यावर हा भयंकर हल्ला होणे आणि यातून त्यांचे थोडक्यात बचावणे, हे जगन्नाथाची कृपाच दर्शवते.
दास म्हणाले, न्यूयॉर्क शहरात पहिली जगन्नाथ रथ यात्रा १९७६ मध्ये मुघल ट्रम्पच्या मदतीने सुरू झाली होती. सुमारे ४८ वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेसने (इस्कॉन) न्यूयॉर्कमध्ये पहिली रथयात्रा काढण्याचे ठरवले. तेव्हा समोर अनेक आव्हानं होती. अशा स्थितीत फिफ्थ एव्हेन्यू रोडवर रथयात्रेला परवानगी देणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. रथ तयार करता येईल अशी रिकामी जागा शोधणेही सोपे नव्हते. अशा स्थितीत मदतीसाठी अनेकांचे दरवाजे ठोठावले, मात्र, उपयोग झाला नाही. अशा स्थितीत ट्रम्प कृष्णभक्तांसाठी एक आशेचा किरण म्हणून समोर आले होते.
मदत मिळत नसल्याने भक्त मंडळी अत्यंत निराश झाले होते. ज्या फर्म मालकांसोबत संपर्क साधण्यात आला होता, त्यांपैकी जवळपास सर्वांनीच ते पेन्सिल्वेनिया रेल्वे यार्डात ती जमीन विकणार असल्याचे म्हटले होते. जगन्नाथ यात्रेसाठी रथ बांधण्यासाठी ही जागा अत्यंत योग्य होती. काही दिवसांनंतर त्यांना सांगण्यात आले की, ट्रम्प यांनी जुन्या रेल्वे यार्डतील जमीन विकत घेतली. भक्त प्रसादासह ट्रम्प यांच्या कार्यालयात पोहोचले. ट्रम्प यांच्या सचिवाने प्रसाद घेतला, मात्र, आपण ज्या कामासाठी आला आहात, त्यासाठी ट्रम्प सहमत होणार नाहीत, असेही त्याने सांगितले. मात्र, येथे चमत्कार होणार होता.
तीन दिवसांनंतर, ट्रम्प यांच्या सचिवाने भक्तांना होलावले आणि म्हणाले की, काय घडने मला माहीत नाही, मात्र त्यांनी (ट्रम्प) आपले पत्र वाचले आणि ते तत्काळ हो म्हणाले. ट्रम्प यांनी रथांच्या निर्मितीसाठी ओपन रेल्वे यार्डचा वापर करण्यास परवानगी दिली होती.