Bangladesh : बांग्लादेशातील सत्तांतरानंतर हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. आता या घटनांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका साधूला अटक करण्यात आली आहे. ISKCON च्या चिन्मय कृष्ण प्रभू असे अटक करण्यात आलेल्या साधूचे नाव असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसिना यांचे सरकार पडल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात बांग्लादेश सनातन जागरण मंचद्वारे चिन्मय कृष्ण सातत्याने आवाट उठवत होते.
यापूर्वी दोन जणांना अटक यापूर्वी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी आणि इतर अनेकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामुळे बांग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या काही भागांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ब्रह्मचारी यांनी हिंदू समाजातील इतर लोकांसह 25 ऑक्टोबर रोजी चितगावमधील न्यू मार्केट चौकात बांग्लादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा ध्वज फडकावला. यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर याप्रकरणी राजेश चौधरी आणि हृदय दास यांना अटक करण्यात आले होते.