नवाज शरीफ, मरियम यांचा मुक्काम तुरुंगातच; जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:58 PM2018-07-17T15:58:04+5:302018-07-17T16:04:43+5:30
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे.
इस्लामाबाद : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे.
गेल्या आठवड्यात लंडनहून पाकिस्तानात आल्यावर नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची कारवाई केली. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले व पोलिसांच्या सुरक्षेत वेगवेगळ्या वाहनांमधून त्यांना आदियाला तुरुंगात नेण्यात आले. दरम्यान, नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांनी जामीन मिळावा, यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेत विनंती केली. मात्र, आज न्यायालयाने त्यांची विनंती नाकारुन जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
Islamabad High Court rejects Nawaz Sharif's and Maryam Nawaz Sharif's request for release on bail: ARY News (file pic) pic.twitter.com/HovlMCmnp7
— ANI (@ANI) July 17, 2018
दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात नवाज शरीफ यांना न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबर, नवाज शरीफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.