ब्रिटनमधील वाढत्या कट्टरवादावर आता पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना तयार केली आहे. या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडोनेशियातील कट्टरपंथी इस्लामिक धार्मिक नेते ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत.
यासाठी व्हिसा वॉर्निंग लिस्ट तयार करण्यात येत आहे. नव्या योजनेनुसार या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व नावांना ब्रिटनमध्ये प्रवेश मिळणार नाही. यासाठी स्वयंचलित प्रवेश बंदीचा प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे.
राजकारणात चतुर असलेले शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान; विश्वासाबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार
इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून ब्रिटनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अनेक निदर्शने झाली. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. ब्रिटिश खासदारांना खुलेआम धमक्या देण्यात आल्या. ब्रिटीश सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या नवीन योजनांनुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इंडोनेशियासारख्या देशांतील अतिरेकी इस्लामिक विचार असलेल्या धर्मोपदेशकांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. रविवारी याबाबत माहिती देण्यात आली.
परदेशातील सर्वात धोकादायक अतिरेकी प्रचारकांची ओळख पटवण्याचे काम अधिकाऱ्यांवर सोपवले जात आहे जेणेकरून त्यांना व्हिसा चेतावणी सूचीमध्ये जोडता येईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याबाबत माहिती दिली. काही दिवसापूर्वी लंडनमध्ये सुनक यांनी भाषण दिल्यानंतर ही माहिती समोर आली आहे, यामध्ये त्यांनी देशाच्या लोकशाही आणि बहु-विश्वास मूल्यांना अतिरेक्यांकडून धोका असल्याचा इशारा दिला होता.
पंतप्रधान सुनक म्हणाले की,व्हिसावर राहणाऱ्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या, त्यांना द्वेष पसरवायचा असेल किंवा आंदोलनादरम्यान लोकांना धमकावायचे असेल तर आम्ही त्यांचा येथे राहण्याचा अधिकार काढून घेऊ. इस्रायल-हमास युद्धाविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना सुनक यांनी हा इशारा दिला होता.
"फुटीरतावादी शक्तींच्या विरोधात आता आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, जे आपल्यात फूट पाडू इच्छितात त्या अतिरेक्यांना तोंड द्यावे लागेल, असेही सुनक म्हणाले. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शनिवारी हजारो लोक लंडनच्या रस्त्यावर उतरले. या काळात शांतता भंग केल्याच्या आरोपावरून महानगर पोलिसांनी १२ जणांना अटक केली.