ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २२ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याने हादरले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.
ब्रसेल्समधील झॅव्हनटेम विमानतळवरील डिपार्चर हॉलच्या भागात मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर मालबीक मेट्रो स्थानकावर स्फोट झाला. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ३४जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
आरटीबीएफच्या वृत्तानुसार सकाळी आठच्या सुमारास हे स्फोट झाले. ब्रसेल्स विमातनळावरील बॉम्बस्फोट हा आत्मघातकी हल्ला असल्याचे बेल्जियमच्या सरकारी वाहिनीने म्हटले आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.
नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी ब्रसेल्समध्ये हल्ला करण्यात आला.