अबुधाबी : सौदी अरेबियाच्या सर्वोच्च मुफ्तींनी बुद्धिबळ हा खेळ इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचा निर्णय दिला. बुद्धिबळामुळे जुगारास उत्तेजन मिळते, बुद्धिबळ खेळणे हा वेळेचा अपव्यय आहे, असेही ते म्हणाले. ‘टीव्ही शो’दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सौदीचे सर्वोच्च मुफ्ती शेख अब्दुल्ला अल-शेख यांनी इस्लाममध्ये बुद्धिबळ निषिद्ध असल्याचे सांगितले. या शोमध्ये अल-शेख प्रेक्षकांनी विचारलेल्या धार्मिक प्रश्नांना उत्तरे देतात. बुद्धिबळ या खेळाचा जुगारात समावेश होतो. त्यामुळे खेळाडूंत द्वेष आणि शत्रुत्व निर्माण होते. त्यामुळे बुद्धिबळ इस्लाममध्ये निषिद्ध आहे. अमली द्रव्य, जुगार, मूर्तिपूजा आणि ज्योतिष्यावर बंदी घालण्याबाबतची कुराणमधील आयत वाचून दाखवत अल-शेख यांनी आपल्या या निर्णयाचे समर्थन केले. (वृत्तसंस्था)
इस्लाममध्ये बुद्धिबळ निषिद्ध, सौदीच्या मुफ्तींचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2016 3:35 AM