ठळक मुद्देया बेटापासून दीड मैलावर मनुष्यवस्ती असून तिथे अवघे ३०० लोकच राहतात.
एडिनबर्ग : स्कॉटलंडमध्ये चक्क एक बेट विकायला काढले आहे. कार्न डिएस असे २२ एकरांच्या बेटाचे नाव असून ते स्कॉटलंडच्या पश्चिमेला आहे. या बेटासाठी भारतीय चलनात ५० लाखांची बोली लावली आहे.
या बेटापासून दीड मैलावर मनुष्यवस्ती असून तिथे अवघे ३०० लोकच राहतात. या बेटावर मात्र कोणतीही मनुष्यवस्ती नाही. परंतु निसर्गसौंदर्याने नटलेल्या बेटावर डॉल्फिन, व्हेल, शार्कसारखे मासे आढळतात. नौकानयन व स्नॉर्कलिंग यांसारखे जलपर्यटन इथे विकसित करणे शक्य आहे. (वृत्तसंस्था)