रफाह : शनिवारी मध्यरात्री राफामध्ये इस्रायलने हवाई हल्ला केल्यानंतर यात २२ जणांचा मृत्यू झाला. यात प्रामुख्याने १८ बालकांचा समावेश होता. दरम्यान, या हल्ल्यादरम्यान एका गर्भवती महिलेचाही मृत्यू झाला. मात्र ही महिला ३० आठवड्यांची गर्भवती आहे, हे कळताच डॉक्टरांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करत चिमुकलीचा जीव वाचविला आहे.
चिमुकल्या सबरीनला श्वास घेण्यास त्रास होत असताना जवळजवळ ती मृत्यूच्या दारात पोहोचली होती. वैद्यकीय कर्मचारी तिला तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेर अनेक प्रयत्नांनंतर तिला वाचवण्यात यश आले. तिची आई, वडील आणि तिची चार वर्षांची बहीणही या युद्धात मारली गेली आहे. त्यामुळे तिच्या भविष्यात सध्या तरी अंधार दिसत आहे. सध्या तिच्या घरात फक्त तिची आजी असून, मी तिची काळजी घेईन, असे तिने म्हटले आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.
इस्रायलच्या गुप्तचर प्रमुखांनी पद सोडले७ ऑक्टोबर रोजी झालेल्या अचानक हल्ल्याची जबाबदारी घेत इस्रायलचे लष्करी गुप्तचर प्रमुख मेजर जनरल अहरोन हलिवा यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. आम्हाला जे काम सोपवले होते ते पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो. माझ्यावर मोठी जबाबदारी होती, असे ते म्हणाले.