इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या अडीज महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजुंनी हवाई हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलचे सैन्य गाझापट्टीत घुसले असून जमिनीखालील हमासचे सुरुंग शोधून नष्ट केले जात आहेत. असे असताना गाझातील रहिवाशांवर कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली आहे. तिथेही इस्त्रायल सैन्य हवाई हल्ले करत आहे. रविवारी रात्री केलेल्या हल्ल्यात ७० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
इस्त्रायलने पॅलेस्टाईनमध्ये कहर मांडला आहे. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्यात ७० लोक मारले गेले आहेत. एका शरणार्थी शिबिराला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात काही घरे सापडली आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार मृत्यूंची संख्या २० हजारच्या वर गेली आहे. यामध्ये दोन तृतियांश महिला आणि मुले आहेत.
हमासचे दहशतवादी सामान्य लोक राहतात त्या ठिकाणांचा आसरा घेत आहेत. तसेच नागरिकांना ढाल बनवून दहशतवादी कृत्ये करत आहेत, असा आरोप इस्त्रायलने केला आहे. तर हे आरोप हमासने फेटाळले आहेत. दुसरीकडे इस्त्रायलने या घटनेची समिक्षा केली जात आहे. नागरिकांना कमीतकमी नुकसान होईल यासाठी आम्ही प्रतिबध्द आहोत, असे म्हटले आहे.
युद्ध सुरु झाल्यापासून लाखो गाझावासियांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. तर हजारो लोक इमारतींच्या मलब्याखाली गाडले गेले आहेत, असे मानले जाते आहे. परिस्थिती भयानक असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर पहिला हल्ला केला. 1200 हून अधिक लोकांची हत्या करण्यात आली आणि 240 लोकांना ओलिस बनवून गाझामध्ये आणण्यात आले होते. 40 इस्रायली नागरिकांना युद्धबंदीच्या अटीवर सोडण्यात आले आहे. 100 हून अधिक इस्रायली लोक अजूनही ओलीस आहेत.