गाझामध्ये एकीकडे युद्धविरामाची चर्चा आहे, तर दुसरीकडे इस्रायली सैन्य जोरदार हल्ले करत आहे. रविवारी आयडीएफने दीर अल-बहाल आणि रफाहसह अनेक ठिकाणी बॉम्बफेक केली. यामध्ये 12 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे अल अक्सा रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा ढीग पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपासमारीने देखील लोकांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्याला पाच महिने उलटले आहेत. याच दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविरामाबाबत काहिरामध्ये बैठकही झाली. पण इस्रायली सैन्य थांबत नाही. ते गाझा पट्टीत कहर करत आहे. काही ठिकाणी निवासी इमारतींना लक्ष्य केले जात आहे, तर काही ठिकाणी मदत साहित्य पोहोचवणारी वाहने फोडली जात आहेत. दीर अल-बलाहचे फोटो मन सून्न करणारे आहेत. येथे इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा नुसीरत निर्वासित शिबिरातील निवासी इमारतीला लक्ष्य केले, ज्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला.
पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट सोसायटीच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने कुवैती ट्रकवर ड्रोनने हल्ला केला, जो पीडितांना मदत करण्यासाठी मदत सामग्री घेऊन जात होता. या हल्ल्यात ट्रक उद्ध्वस्त झाला. दीर अल-बलाहशिवाय इस्रायली लष्कराने रफाह शहरालाही लक्ष्य केलं. येथील हवाई हल्ल्यात दोन निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या. इमारतींच्या कचऱ्याचे ढीग झाले होते. मात्र, या ढिगाऱ्यातून तीन जणांची सुटका करण्यात आली. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात किती लोकांचा मृत्यू झाला हे कळू शकलं नाही.
दुसरीकडे अमेरिका इस्रायलला नागरिकांवर हल्ले करण्यापासून रोखत आहे. गाझामधील लोकांना अन्नाची पाकिटं देत आहे. इस्रायल गेल्या पाच महिन्यांपासून सतत हे युद्ध लढत आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस म्हणाल्या की, गाझामधील लोक उपासमारीने मरत आहेत. अशा परिस्थितीत तात्काळ युद्धविराम व्हायला हवा. त्यांनी इस्रायलला गाझामध्ये आणखी मदत सामग्री येऊ द्यावी, असे आवाहनही केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्येही उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.
यूएनन दिलेल्या माहितीनुसार, गाझाच्या 23 लाख लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांना पुरेसे अन्न आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझाला मदत सामग्रीचा पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. अलाबामाला पोहोचल्यानंतर सांगितले की, किमान सहा आठवड्यांचा युद्धविराम असावा जेणेकरून इस्त्रायली ओलीसांना तेथून बाहेर काढता येईल.