Israel Attack On Fateh Sherif:इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष तीव्र झाला आहे. शुक्रवारी(दि.27) इस्रायलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ला करत हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा खात्मा केला होता. त्यानंतर आता इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर हल्ला करुन कमांडर फतेह शेरीफ याचाही खात्मा केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने ही माहिती दिली.
आयडीएफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले की, हा हल्ला पहाटे अचूकपणे करण्यात आला. दक्षिण लेबनीज टायर शहरातील अल-बास निर्वासित शिबिरावर झालेल्या हवाई हल्ल्यात हमास प्रमुख फतेह शेरीफ, त्याची पत्नी आणि मुले ठार झाले आहेत. लेबनॉनमधील दहशतवादी कारवायांवर देखरेख करणारा शेरीफ हमासमधील प्रमुख व्यक्ती होता. तसेच, हमासला हिजबुल्लाहच्या लोकांशी जोडण्यातही त्याची महत्वाची भूमिका होती.
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
काय करायचा शेरीफ इस्रायलच्या म्हणण्यानुसार, शेरीफ दहशतवाद्यांची भरती करणे आणि शस्त्रास्त्रे मिळवण्याची कामे करायचा. शेरीफ दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जो कोणी इस्त्रायली नागरिकांना धोका निर्माण करेल, त्याचा खात्मा केला जाईल.